मुंबई

पर्यटनातून निसर्गाच्या सान्निध्यात!

CD

पर्यटनातून निसर्गाच्या सान्निध्यात!

‘निसर्ग उन्नत मार्गा’चे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : निसर्गाचा समतोल राखून महापालिकेने मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. या मार्गाचे रविवारी (ता. ३०) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्‌घाटन केले. मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांसाठी उत्तम पर्यटनस्थळाबरोबरच पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगानेही हा प्रकल्प जनजागृतीसाठी आदर्श ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्त केला.

नागरिकांसाठी हा उन्नत मार्ग दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या वेळी निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सुरक्षेच्या काटेकोर उपाययोजना करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांना लोढा यांना दिले. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश गगराणी यांनी दिले.
-------------
ऑनलाइन तिकीट नोंदणी
- निसर्ग उन्नत मार्ग येथे भेट देण्यासाठी https://naturetrail.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन सशुल्क ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय आहे.
- नागरिकांसाठी २५ रुपये, तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या मार्गावर एकाच वेळी २०० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
- हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचे खंड (स्लॉट) करण्यात आले आहेत. ऑनलाइन तिकीट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्याने प्रवेश आणि निर्गमासाठीचा पर्याय देण्यात आला आहे.
------
पर्यटकांवर नियंत्रण अन्‌ आपत्कालीन मार्ग
पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम (प्रवेश नियंत्रण प्रणाली) विकसित करण्यात आली आहे. प्रकल्प नियंत्रण कक्षातून संपूर्ण उन्नत मार्गावर देखरेख ठेवणे तसेच भेट देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेष मार्गाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
......
जैवविविधतेचे दर्शन
मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी न्याहाळण्यास या ठिकाणी मिळणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी निसर्गाच्या कुशीतील खजिना पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT