मुंबई

मुंबई विद्यापीठ ‘कव्वाली’त प्रथम

CD

मुंबई विद्यापीठ ‘कव्वाली’त प्रथम
आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेतील यश

मुंबई, ता. ३० ः भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सातव्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावून गौरवास्पद कामगिरी केली आहे. हरियाना येथील महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ येथे २८ व २९ मार्चला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत भारतातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती.
मुंबई विद्यापीठाच्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट गायनशैलीने आणि सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या यशाबद्दल कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी विजयी चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेतील मुंबई विद्यापीठाच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले तसेच भारतीय संस्कृतीतील कव्वाली या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले. या स्पर्धेत शुधांशू सोमण, निधी खाडिलकर, आर्या गोडबोले, मयूरेश वानखडे, मायकल जोश, सृष्टी जगताप, हर्षकिरण परिहार, तन्मय म्हात्रे, तुषार शिरसाट आणि मयूर मगरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. चमू व्यवस्थापक म्हणून सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे आणि साहिल जोशी यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT