मुंबई

आर्थिकदृष्ट्या गरजूंना २२ कोटींची मदत

CD

आर्थिकदृष्ट्या गरजूंना २२ कोटींची मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजूंसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जाते. मार्च महिन्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत तब्बल २,५१७ रुग्णांना तब्बल २२ कोटींहून अधिकची मदत करण्यात आली असून सर्वाधिक मदत ही मेंदू विकारांवरील उपचारांसाठी करण्यात आली असल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे.
मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१ रुग्णांना मदत करण्यात आली. तसेच कर्करोगावरील उपचारांसाठी ४२१ रुग्णांना, हिप रिप्लेसमेंटच्या ३०६ रुग्णांना, अपघातामधील शस्त्रक्रियेसाठी २४७ रुग्णांना, हृदयविकारांवरील उपचारांसाठी २३९ रुग्णांना, अपघातांसंबंधित १८४ रुग्णांना, गुडघाबदलासाठी १५० रुग्णांना, बालरोगांवरील उपचारांसाठी १४५ रुग्णांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत सहाय्याची रक्कम पोहोचवली जात आहे. ‘समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षास सढळ हाताने मदत करावी, जेणेकरून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना आर्थिक मदत करता येईल. राज्यातील गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कक्षाद्वारे देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच या कक्षाद्वारे देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

IPL 2026 Live: साई सुदर्शनने शतक झळकावले, RCBच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम! GT ने उभे केले तगडे लक्ष्य

शिक्षण संचालकांचे आदेश! अतिरिक्त शिक्षकांच्या पगारीचा मार्ग मोकळा; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांच्या लॉगिनमधून पगार बिले पाठविण्याचे आदेश, हा बदल एकदाच

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT