सल्लागार महिलेस दीड कोटींचा गंडा
मुंबई, ता. ४ ः गुंतवणुकीशी संबंधित सल्लागार महिलेस भामट्यांनी फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे तब्बल १.६२ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे. या फसवणुकीबद्दल सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारीला ५० वर्षीय तक्रारदार महिलेने इन्स्टाग्रामवरील शेअर ट्रेडिंगबाबतची जाहिरात उघडून पाहिली असता ती आपोआप एका नामांकित कंपनीच्या नावाने सुरू असलेल्या व्हॉट्सॲप समूहात दाखल झाली. तेथे या कंपनीद्वारे शेअर ट्रेडिंग केल्यास भरघोस फायदा मिळेल, या प्रलोभनास बळी पडली. तिने टप्प्याटप्याने १.६२ कोटी रुपये गुंतवले; मात्र गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला सेवा कर म्हणून १९ लाख रुपये भरण्याबाबत सूचना करण्यात आली. तेव्हा या महिलेने संबंधित कंपनीचे कार्यालय गाठून चौकशी केली तेव्हा अशा प्रकारचा समूह आपला नाही, अशा प्रकारे गुंतवणूक करून घेत नाही, अशी माहिती कंपनीने देताच महिलेस फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर तिने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.