आरोपीस नव्याने अटक करण्याची पोलिसांवर वेळ
मुंबई, ता. ४ ः अनैसर्गिक अत्याचारानंतर सात वर्षांच्या बालकाच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपीस नव्याने अटक करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. काल ही अटक अवैध ठरवून सत्र न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला होता. तो आज (ता. ४) न्यायालयाने रद्द करत पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
जामिनावर सुटताच आरोपी पसार झाल्यास आणि त्याच्या फेर अटकेस विलंब झाल्यास पोलिसांवर नामुष्की ओढवू शकेल, अशी चर्चा न्यायालयात रंगली होती. आरोपीच्या आईस लेखी कळवण्यात न आल्याने न्यायालयाने अटक अवैध ठरवत आरोपीस जामिनावर मुक्त केले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ४) संबंधित पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला. या अर्जात अटक आरोपीच्या मित्रास आणि आईस लेखी कळविण्यात आले होते; मात्र तपास अधिकाऱ्याने ही माहिती न्यायालयास दिली नाही, त्यामुळे गैरसमज झाला, असा दावा केल्यावर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीचा जमीन रद्द केला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांना या आरोपीस नव्याने अटक करून रिमांडसाठी हजर करावे लागेल, असे सांगण्यात आले. हा आरोपी मूळचा बिहारचा असून तात्पुरत्या स्वरूपात भिवंडीस वास्तव्यास होता. सीसीटीव्ही चित्रणाआधारे पोलिसांनी त्याला कुर्ला परिसरातून अटक करण्यात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.