हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल सकारात्मक
न्यू इंडिया बँक घोटाळा
मुंबई, ता. ४ ः न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हितेश मेहता याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झाला आहे. या अहवालाचा निष्कर्ष सकारात्मक असून तपासाला दिशा देणारा आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
या चाचणीचा निष्कर्ष मेहताचा घोटाळ्यातील सहभाग, सहआरोपींनी दिलेल्या जबाबाशी मिळताजुळता आणि तपासकामी दिशादर्शक ठरल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. लायडिटेक्टर चाचणी फसल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ब्रेन मॅपिंग चाचणी करून घेतली होती. लायडिटेक्टर चाचणीत मेहताने हातची राखून माहिती दिल्याने दिशाभूल करणारा किंवा संभ्रम निर्माण करणारा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती पडला. २०१९ ते २०२४ दरम्यान मेहता बँकेचा महाव्यवस्थापक होता. या काळात त्याने बँकेच्या तिजोरीतून टप्प्याटप्प्याने १२२ कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. दरम्यान, बँकेत मेहताच्या नावे असलेला लॉकर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने उघडला. त्यात सुमारे १५ लाख रुपये मूल्य असलेली सोन्या-चांदीची नाणी हाती लागल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.