मुंबई

‘एल्फिस्टन’ वाहतूकीसाठी बंद

CD

‘एल्फिन्स्टन’ वाहतुकीसाठी बंद!
मुंबई, ता ९ : अटल सेतूला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडण्यासाठी वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम एमएमआरडीने हाती घेतले आहे. या कामासाठी एल्फिन्स्टन रेल्वे पुलाच्या पाडकामासाठी गुरुवार, १० एप्रिलपासून वाहतूक पोलिसांची परवानगी एमएमआरडीएने मागितली आहे. तत्पूर्वी वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्यासंदर्भात नागरिकांकडून १३ एप्रिलपर्यंत हरकती आणि सूचना मागितल्या आहेत. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.

वाहतूक पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल केले आहेत. यामध्ये दादर पश्चिमकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक येथून उजवे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने खोदादाद सर्कल येथून डावे वळण घेऊन टिळक ब्रिजमार्गे जातील. तर प्रभादेवी व वरळीकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक सरळ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने कृष्णनगर जंक्शन-परेल वर्कशॉप-सुपारी बाग जंक्शन- भारत माता जंक्शन उजवे वळण घेऊन महादेव पालव मार्गाने करी रोड रेल्वे ब्रिजवरून शिंगटे मास्तर चौकावरून उजवे वळण घेऊन लोअर परेल ब्रिजमार्गे जातील. तर प्रभादेवी पुलामार्गे परेल परिसराकडे जाणारी वाहने संत रोहिदास चौक (प्रभादेवी जंक्शन) येथून लोअर परेल पुलामार्गे करी रोड रेल्वे पुलावरून भारत माता जंक्शन येथून जातील. दुसरीकडे सेनापती बापट मार्गाने प्रभादेवी पुलामार्गे सायन, माटुंग्याकडे जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावे वळण घेऊन व्ही. एस. मटकर मार्ग व बाबुराव परुळेकर मार्ग येथून उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोडने पुढे कबुतरखाना येथून पुढे टिळक पुलामार्गे खोदादाद सर्कल येथून जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT