मुंबई

३१ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती

CD

३१ हजार विद्यार्थ्यांना
‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती
बँक खात्यावर निधी हस्तांरित
मुंबई, ता. १० : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात राज्यातील ३१ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (एनएमएमएस) एकूण सुमारे ३८ कोटी रुपये वितरण करण्यात आले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यात एकूण ३६,३७६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३५,४१४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून, नवीन ८,९३७ आणि नूतनीकरण २२,७३० अशा एकूण ३१,६६७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. उर्वरित सुमारे तीन हजार ७०० विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत लिंक केले नाही त्यांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
--
एनएमएमएस परीक्षा आणि निकाल
२०२५-२६ करिता डिसेंबर २०२४ मध्ये एनएमएमएस विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल १ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासाठी ११,६८२ शिष्यवृत्तींचा कोटा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार राज्यात कोल्हापूरमधून सर्वाधिक एक हजार ७०३, तर सर्वात कमी दक्षिण मुंबईतून ४५ विद्यार्थांची निवड झाली.
----
अशी दिली जाते शिष्यवृत्ती
- इयत्ता ९वी ते १२वीपर्यंत चार वर्षांसाठी दरमहा १,००० रुपये शिष्यवृत्ती
- पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना योजना लागू आहे.
- इयत्ता १०वीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT