मुंबई

तहाव्वूरविरोधातील खटला कुठे चालणार?

CD

तहाव्वूरविरोधातील खटला कुठे चालणार?
मुंबई की दिल्लीत; राणा हाच सूत्रधार; एनआयएचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः २६/११ हा दहशतवादी हल्ला मुंबईत झाला असला, तरी प्रत्यार्पित आरोपी तहाव्वूर राणाविरोधातील खटला दिल्लीत चालवला जाणार की मुंबईत, यावरून सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एकाच गुन्ह्यात दोन ठिकाणी स्वतंत्र खटला चालवता येत नाही. या कायदेशीर तरतुदीमुळे राणाविरोधातील खटला एकाच ठिकाणी चालेल. या हल्ल्यात अन्य आरोपी अबू जुंदालविरोधातील खटला मुंबईच्या विशेष न्यायालयात सुरू होता. दिल्ली पोलिसांच्या एका याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये ही सुनावणी स्थगित केली होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा रंगली आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २६/११ हल्ल्याच्या कटात सहभागी डेव्हिड हेडली ऊर्फ दाऊद गिलानीने मुंबई न्यायालयात वरील मुद्दा उपस्थित केला होता. २६/११ हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांच्या हत्येबद्दल त्या देशात (अमेरिका) आधीच खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आपल्याला शिक्षाही झाली आहे. असे असताना भारतात त्याच गुन्ह्याचा खटला चालवता येणार नाही, असा युक्तिवाद हेडलीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर केला होता. त्या दाव्यावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. पुढे त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले होते.
हा हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी अतिरेक्यांना कराची येथील नियंत्रण कक्षातून आदेश देणारा अबू जुंदाल ऊर्फ सय्यद झबीउद्दीन अन्सारी (मूळ रा. बीड) याला २०१२ मध्ये अटक करण्यात आली. गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. २०१५ मध्ये मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने त्याच्याविरोधात आरोप निश्चित केले; मात्र जुंदालने सौदी अरब ते भारतादरम्यान केलेल्या प्रवासाची माहिती सादर करण्याबाबत सत्र न्यायालयाने तपास यंत्रणेला दिलेल्या आदेशाविरोधात दिल्ली पोलिसांनी २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने जुंदालविरोधातील मुंबईत सुरू असलेल्या २६/११ हल्ला खटल्यास स्थगिती दिली. एनआयएने गुरुवारी (ता. १०) दिलेल्या माहितीत राणाला २६/११ हल्ल्याचा सूत्रधार संबोधले आहे. त्याने हेडली, लष्कर व हुजी या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी व्यक्तींसोबत २६/११ हल्ल्याचा कट रचला, असा दावाही एनआयएने केला आहे.
-----
दिल्ली न्यायालयात दाखल होते आरोपपत्र
दरम्यान, जुंदाल हा लष्कर-ए-तोयबाच्या अन्य साथीदारांसोबत स्फोटकांची जमवाजमव करत होता. भारतात काही ठिकाणी दहशतवादी कृत्ये घडवण्याचा त्यांचा इरादा होता, असा आरोप ठेवत एनआयएने जुंदालविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्या प्रकरणाची सुनावणी अद्याप दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. गुन्हे शाखेने २०१२ मध्ये जुंदालविरोधात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात हेडली किंवा राणा यांचा उल्लेख नव्हता. त्याच सुमारास एनआयएने राणाला फरार आरोपी घोषित करीत दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, तर मुंबई गुन्हे शाखेने हाच दावा २०२३ मध्ये येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT