मालमत्तेच्या वादातून गोळीबार?
मुंबई, ता. १० : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सदरुद्दीन खान यांच्यावरील गोळीबार पश्चिम उपनगरातील एका मालमत्तेवरून घडल्याचा संशय पोलिसांना आहे. याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य, गुन्हेगारी जगतातील वैमनस्य आदी दृष्टिकोनातूनही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केल्याचे समजते. आरोपींना अटक करण्यासाठी विविध पोलिस पथके प्रयत्नशील आहेत, अशी माहिती सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी माध्यमांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.