‘प्रहार’चे शिष्टमंडळ शेलार यांच्या भेटीला
मुंबई, ता. ११ : शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांना सहा हजार मासिक मानधन मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मुंबई पालकमंत्री आशीष शेलार यांची भेट घेतली. बच्चू कडू यांच्या मशाल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. मुंबई संपर्क अध्यक्ष ॲड. अजय तापकीर व प्रदेश प्रवक्ते ॲड. मनोज टेकाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शेलार यांच्याशी चर्चा केली. शेलार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत विधानसभेत प्रश्न मांडण्याचे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि वाढती महागाई लक्षात घेता, या मागण्यांचा विचार होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. या वेळी विविध विधानसभा व लोकसभा क्षेत्रातील प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.