बिघाड झाल्यास करा कोणत्याही एसटी बसमधून प्रवास
आधीच्याच तिकिटावर प्रवासाची प्रवाशांना मुभा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुलांना येत्या काही दिवसांत उन्हाळ्याची सुट्टी पडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गावची वाट धरण्याचे नियोजन केले आहे. गावी जाताना लालपरी एसटी बस मध्येच बंद पडल्यास अशा वेळी प्रवाशांना त्याच तिकिटावर मागून येणाऱ्या लालपरीऐवजी वातानुकूलित शिवशाही किंवा शिवनेरी बस आली तर त्या बसमधून प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता एसटी महामंडळाने रस्त्यात बस बिघडल्यास त्याच तिकिटावर प्रवाशाला कुठल्याही वातानुकूलित एसटीमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. इतर बसचे चालक-वाहक बसमध्ये देण्यास नकार देत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
भरउन्हात ताटकळण्याची गरज नाही
कुठल्या मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडल्याचा प्रकार घडल्यास पूर्वी प्रवाशांना भरउन्हात दुसऱ्या बसची वाट पाहावी लागत होती. आता नवीन नियमामुळे प्रवाशांना उन्हात ताटकळण्याची गरज नाही.
नियमात बदल
पूर्वी ज्या श्रेणीची बस बंद पडली आहे, त्याच श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. आता या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. कनिष्ठ श्रेणीच्या बसमधील प्रवाशांना यापुढे कोणत्याही वरिष्ठ श्रेणीच्या बसमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असल्याचे सांगण्यात आले.
या बसचे तिकीट सर्वात महाग
एसटी महामंडळाकडे अनेक श्रेणीच्या बस आहेत. त्यात निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या बसचे तिकीट अधिक महाग असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.