ग्रामीण आरोग्यसेवेसाठी चोलामंडलमकडून रुग्णवाहिका
मुंबई, ता. १३ : चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.ने सीएसआर उपक्रमाअंतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नुकत्याच दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका दिल्या. इंडियन हेड इंज्युरी फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज असलेल्या या ॲम्ब्युलन्स, आपत्कालीन आरोग्य गरजांसाठी रुग्णवाहतूक, तपासणी व ट्रॉमा केअर सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. यामुळे विशेषतः ग्रामीण व दुर्लक्षित भागांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला जलद प्रतिसाद देण्याची जिल्ह्याची क्षमता वाढेल. याप्रसंगी संभाजीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, पुण्यातील कृषीसंचालक विनयकुमार आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत, तसेच चोला एमएस जनरल इन्शुरन्सचे व्ही. सूर्यानारायणन, व्यवस्थापकीय संचालक महेंद्रकुमार त्रिपाठी, मुख्य अंमलबजावणी अधिकारी व कंपनी सेक्रेटरी शंकरनारायणन के. एस., कमोडोर रणबीर तलवार (निवृत्त) आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.