शाळांमध्ये पोषण पंधरवडा साजरा करण्याचे आदेश
परीक्षा, निकालांच्या काळात शिक्षकांमध्ये नाराजी
मुंबई, ता. १३ : राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या नियोजित मूल्यांकन चाचणी परीक्षा आणि त्याच्या निकालाची धावपळ सुरू असताना शालेय शिक्षण विभागाने २५ एप्रिलपर्यंत पोषण पंधरवडा (पोषण पखवाडा) साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून परीक्षा आणि निकालाचे कामकाज सुरू असताना या आदेशाचे कामकाज कधी करायचे, असा सवाल शिक्षकवर्गातून केला जात आहे.
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून, राज्यातील शाळांमध्ये ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात राज्यातील सर्व शाळांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात शाळांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल तयार करून आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती, सहभागी विद्यार्थी आणि पालकांची संख्या आणि इतर कोणत्याही उल्लेखनीय बाबींचा समावेश करून हा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्याचा आदेशही देण्यात आला असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
..
कार्यक्रम करायचे कधी?
पोषण पंधरवडा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सहभागातून सर्जनशीलता वाढवणे, यासाठी या कार्यक्रमात पालकांचा सहभाग करून घेणेही आवश्यक आहे. यात कुटुंबातील व्यक्तींमध्ये खाण्याच्या सवयी, पौष्टिक आहार यावर चर्चा करून ‘घरचे आरोग्यदूत’ संकल्पना विकसित करणे, पारंपरिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक अन्न आणि स्थानिक कृषी पद्धती तसेच परसबागेतील विविध भाजीपाला व याबद्दल शिकण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्यक्रम असून इतके सर्व कार्यक्रम आम्ही कधी करायचे, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.