‘ट्रान्सएरिआ’च्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन
सोमय्या विद्यापीठात संशोधनासाठी विद्यार्थ्यांना संधी
मुंबई, ता. १३ ः विद्याविहार येथील सोमय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजच्या ‘ट्रान्सएरिआ’ या शोधपत्रिकेच्या पहिल्या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. या माध्यमातून विद्यापीठात प्रथमच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीयस्तरावर संशोधनासाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे.
सोमय्या विद्यापीठाच्या संकुलात आयोजित या कार्यक्रमाला कुलगुरू समीर सोमय्या, प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई, भाषा अभ्यासक तथा सोमय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे संचालक डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार व माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्राकडून पुढील शैक्षणिक वर्षात राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या बरोबरीने संशोधन प्रकल्पांच्या अधिकृत घोषणेचा भाग म्हणून ‘ट्रान्सएरिआ’ शोधपत्रिकेचे प्रकाशन झाल्याचे डॉ. देवी यांनी दिली. वसाहतवाद आणि त्याविषयीच्या पूर्वाग्रहदूषित विचारांच्या प्रभावाने ग्रासलेल्या लिखाणाला एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी द्वैवार्षिक स्वरूपाची ही शोधपत्रिका महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे शोधपत्रिकेचे मुख्य संपादक डॉ. गौरव गाडगीळ यांनी म्हटले.
----
अनुवादित पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणार
दरम्यान, जगभरात होणारे संशोधन व समाज यांच्यातील ज्ञानव्यवहार वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने स्कूलकडून राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानसेतू’ प्रकल्पाची माहिती या वेळी देण्यात आली. वर्षाअखेरपर्यंत या प्रकल्पातील निवडक अनुवादित पुस्तके पद्मगंधा प्रकाशनाच्या सहकार्याने प्रकाशित करून महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.