मुंबई

मुंबई विद्यापीठातर्फे जय भीम पदयात्रेचे आयोजन

CD

मुंबई विद्यापीठातर्फे ‘जय भीम पदयात्रे’चे आयोजन

मुंबई, ता. १३ : मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्ष आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. १३) ‘जय भीम पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते.
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ९०० हून अधिक स्वयंसेवक आणि एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला. ही पदयात्रा नरिमन पॉइंट येथील बाबासाहेबांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करीत मादाम कामा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या वेळी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे हे उपस्थित होते. या पदयात्रेच्या आयोजनामध्ये एनएसएसचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी नीलेश पाठक, नेहरू युवा केंद्राचे प्रकाश मनुरे यांनी आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पदयात्रेतील युवापिढीचा हा सक्रिय सहभाग निश्चितच बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे एनएसएसचे विशेष कार्य अधिकारी सुशील शिंदे यांनी व्यक्त केला.
Associated Media Ids : MBI25B21823, MBI25B21824

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT