सल्लागारासाठी ७५ लाखांचा खर्च
वांद्रे येथे कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामासाठी तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई महापालिकेकडून वांद्रे येथे नवे कर्करोग रुग्णालय उभारत आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी सल्लागार कंपन्यांची नियुक्ती पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष विभागाकडून केली जात असून यावर सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे.
वांद्रे पश्चिम येथील आर.के. पाटकर रोड येथे कर्करोग रुग्णालयाचा पुनर्विकास केला जात आहे. पुनर्विकासाचा आराखडा महापालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञ विभागाने तयार केला आहे. प्रस्तावित आराखड्यात तळघर १ + तळघर २ + तळमजला १० मजले असे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. या इमारतीमध्ये तळघर १ ते ८ मजले रुग्णालय आणि ९ व १० मजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवासस्थान प्रस्तावित केले आहे.
प्रस्तावित रुग्णालयाच्या संरचनात्मक रचना आणि आराखड्यासाठी सल्लागारांची नेमणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार, मे. जस्ट इंजिनिअर्स यांची नेमणूक करण्याचे प्रस्तावित होते. सल्लागाराची निवड करण्यासाठी तालिकेवर असलेल्या सल्लागारांना ई-मेलद्वारे कळवण्यास सांगितले होते. या सल्लागारांमध्ये समान न्याय मिळावा यासाठी मागील तीन वर्षात महापालिकेत काम न केलेल्या सल्लागारांना संधी देण्याचे ठरवले होते. रुग्णालयाच्या बांधकामासाठी आराखडे बनवणे, आराखड्यांना मंजुरी देणे, निविदा तयार करणे, प्राप्त निविदांचे विश्लेषण/मूल्यमापन करण्याचे काम मे. जस्ट इंजिनिअर्स यांनी पूर्ण केले. हा प्रकल्प पूर्ण करण्यास ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आता त्यात वाढ करून त्याची रक्कम ७४ लाख ९९ हजार ७९२ रुपयांवर गेली आहे. पालिका प्रशासनाने या खर्चाला मंजुरी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.