पूर्व द्रुतगतीवर वाटणारी
करणाऱ्यांना अटक
मुंबई ः पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्री अपरात्री वाहने थांबवून लुटमार करणाऱ्या दोघांना विक्रोळी पोलिसांनी अटक केली. वेदांत येरम आणि कुणाल सोंडकर अशी या तरुणांची नावे आहे. महापालिकेच्या कचरावाहक वाहनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या दोघांची ओळख पटविल्याचे पोलिसांनी सांगितले. चार एप्रिल रोजी द्रुतगती मार्गाने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या स्वप्नील भाबुदे या तरुणास दोघांनी धक्का लागल्याचे निमित्त करून अडवले. त्याला मारहाण करीत दुचाकी, मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले, मात्र अंधारामुळे अस्पष्ट दिसत होते. घटनेवेळी बाजूने पालिकेची कचरा गाडी गेल्याचे स्वप्नीलने जबाबात सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी कचऱ्याची ती गाडी शोधून त्यावरील सीसीटीव्ही चित्रणात दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसले. त्या आधारे पोलिसांनी त्यांना ठाण्यातून अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.