मुंबई

एल्फिन्स्टन पूल सुरूच राहणार

CD

एल्फिन्स्टन पूल सुरूच राहणार
मुंबईकरांना तूर्तास दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे. १६ एप्रिलपासून वाहतूक वळविण्यात येणार होती; मात्र उद्यापासून वाहतूक बदल लागू नसतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
एल्फिन्स्टन पुलाबाबत बुधवारपासून (ता. १६) वाहतूक वळविण्यात येणार होती; मात्र वाहतूक वळविण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त समाधान पवार यांनी सांगितले. जुना पूल पाडून त्या ठिकाणी डबलडेकर पुलाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याने पुलाच्या नियोजित पाडकामाबाबत १३ एप्रिलपर्यंत सूचना-हरकती मागवण्यात आल्या. नागरिकांनी हरकती न घेतल्यास वाहतूक बंद करून पाडकामाला सुरुवात होणार होती; मात्र सोमवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत पुन्हा मंगळवारी (ता. १५) बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार बैठक झाली; मात्र मंगळवारीही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सध्यातरी पुलावरील वाहतूक ‘जैसे थे’ राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT