मुंबई

काँक्रीटीकरणाच्या कामामुळे पाणी तुंबण्याचा धोका

CD

काँक्रीटीकरणाच्या कामामुळे पाणी तुंबण्याचा धोका
अपूर्ण कामांचा ताप वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अवघड आहे. त्यातच पावसाळा तोंडावर असल्याने पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी आढावा घेऊन कामे शीघ्र गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असले, तरी त्यात किती यश मिळेल याबाबत साशंकता आहे.
महापालिकेच्या रस्ते विभागाकडून मुंबईतील अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. शहर भागातील कामे तुलनेने उशिराने सुरू झाली. यामुळे बरीच कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करायची आहेत. दरम्यान, कामांची गती पाहता पुढील पावसाळ्याच्या अगोदर म्हणजेच महिनाभरात पूर्ण करणे अवघड आहे. त्यातच सुमारे २० पुलांची कामेदेखील सुरू असून, त्यामुळेदेखील वाहतूक कोंडी आणि पाणी तुंबण्याचा ताप वाढण्याची शक्यता आहे.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेने रस्ते काँक्रीटीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत एक हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रस्ते कामांसाठी नऊ कंत्राटदार नेमण्यात आले असून, त्यांच्यामध्ये कामाच्या प्रगतीत फरक आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करीत आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बैठकीत कंत्राटदारनिहाय आढावा घेत ३१ मेपूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे.
कामांचा दर्जा अत्‍युच्‍च असावा, यासाठी आयआयटी मुंबईची त्रयस्‍थ संस्‍था म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. महापालिकेचे अभियंते प्रत्‍यक्ष स्‍थळी उपस्थित राहून कामकाजावर वैयक्तिक देखरेख ठेवत आहेत.

दोन कंत्राटदारांवर कारवाई
रस्त्यांची कामे जलदगतीने आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण व्हावीत, यासाठी पालिका प्रशासन लक्ष ठेऊन आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर कामांच्या ठिकाणी भेटी देत आहेत. ज्या ठिकाणची कामे नियमानुसार झालेली नाहीत अशा दोन कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाईदेखील केली आहे.

रस्ते काँक्रीटीकरणाची कामे
:
- शीव (पूर्व) येथील रस्ता क्रमांक २७ वरील काँक्रीटीकरण
- एफ उत्तर विभागामध्ये रस्ते काँक्रीटीकरण कामांच्या अनुषंगाने जलवाहिन्या अंथरण्याची कामे
- ए विभागातील बॉम्‍बे हॉस्पिटलजवळील चौक
- सी विभागातील आर. एस. सप्रे मार्ग
- एफ उत्तर विभागातील माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग
- एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१
- बी विभागातील कारागृह मार्ग
- एम पूर्व विभागातील डॉ. नीतू मांडके मार्ग
- बोरिवली पश्चिम येथील श्री. अय्यप्पा मंदिर मार्ग
- सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक
- जोगेश्वरी पूर्व येथील हनुमाननगर, नटवरनगर
- गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग
- सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक
- बोरिवली पश्चिम येथील एलआयसी वसाहतीतील रस्‍ते
- सांताक्रूझ पूर्व ते कलिना मिलिटरी कॅम्‍प मार्गावरील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग
- मानखुर्द, महाराष्ट्रनगर येथील भुयारी मार्ग
- नाहूर पूर्व येथील सेनरूफ मार्ग
- भांडुप पूर्व येथील ट्रॉली लाइन मार्ग
- मुलुंड (पूर्व) गवाणपाडा येथील होली एंजल मार्ग
- भांडुप (पूर्व) येथील ट्रॉली लाइन मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT