मुंबई पोलिसांकडून
तहव्वूर राणाची
आठ तास चौकशी
मुंबई, ता. २६ : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या तहव्वूर राणाकडे मुंबई गुन्हे शाखेने २६/११ हल्ल्याबाबत आठ तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान राणाने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मूळचा पाकिस्तानी असलेला राणा कॅनेडियन नागरिक आहे. अलीकडेच २६/११ हल्ल्याप्रकरणी त्याचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या चार अधिकाऱ्यांनी दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात राणाकडे चौकशी केली. या पथकाला आणखी काही तास राणाची चौकशी करण्याची संधी एनआयएकडून दिली जाणार आहे.
पाकपुरस्कृत मुंबई हल्ल्यासाठी नेमकी ठिकाणे निवडण्याची जबाबदारी सहआरोपी डेव्हिड हेडलीकडे होती. त्याच्या चौकशीदरम्यान राणाचे नाव उघड झाले होते. या दोघांनी भारतात व्हिसा सेवा केंद्र सुरू केले होते. त्याआडून त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.