मुंबई

कोरोनाविरोधात कामा रुग्णालय सज्ज

CD

कोरोनाविरोधात कामा रुग्णालय सज्ज
३० खाटांची व्यवस्‍था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये त्यांच्या सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करीत आहेत. मुंबईतील कामा आणि अल्बलेस रुग्णालय आपल्या सर्व सुविधांनी सुसज्ज झाली आहेत. रुग्‍णालयाने ३० खाटांची व्यवस्‍था केली आहे.
कामा आणि अल्बलेस रुग्णालय हे राज्यातील महिलांसाठी आणि बालकांसाठी समर्पित असलेले एकमेव रुग्णालय आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कामा रुग्णालयाने पुन्हा एकदा स्त्रिया आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मागील लाटेत दाखवलेल्या तत्परतेप्रमाणेच या वेळीही रुग्णालय प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह स्त्रिया व बालकांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था केली आहे.
कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले, ‘‘कोरोनाची लाट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. या पार्श्वभूमीवर स्त्रिया आणि बालकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मागील अनुभवावरून आम्हाला हे लक्षात आले की, स्वतंत्र कक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही ही व्यवस्था वेळीच उभारली आहे. ‌तसेच त्यांनी सतर्कता आणि काळजी घेण्याचे आवाहनदेखील केले आहे. रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अशा प्रकारच्या सकारात्मक आणि नियोजनबद्ध उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.

विशेष सुविधांनी युक्त स्वतंत्र कक्ष
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने सुरू करण्यात आलेल्या या कक्षात एकूण ३० खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून, त्यात १० खाटा बालकांसाठी आणि २० खाटा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कक्षात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुभवी आणि प्रशिक्षित महिला डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT