मुंबई

सर्वकष मूल्यमापनासाठी शिक्षकांना सर्वंकष प्रशिक्षण

CD

सर्वंकष मूल्यमापनासाठी शिक्षकांना सर्वंकष प्रशिक्षण
विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यावर सर्वाधिक भर

मुंबई, ता. २४ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये सर्वंकष मूल्यमापन पद्धत विकसित करून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक विषयाचे कौशल्य, प्रश्नांची ओळख करून त्यासाठीचे मूल्यमापन केले जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया अत्यंत प्रभावीपण राबविण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पुढाकार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काळात परीक्षा पद्धती आणि त्यांच्या मूल्यांकनात आमूलाग्र बदल होणार आहेत. यासाठी ‘एससीईआरटी’मार्फत शिक्षकांपासून ते संबंधित अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती ‘एससीआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०प्रमाणे महाराष्ट्र राज्य मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा वैविध्यपूर्ण आणि केंद्रीय मंडळाशी पूरक पॅटर्नवर तयार केला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात एससीईआरटीच्या धर्तीवर पहिलीपासून अभ्यासक्रम लागू केला जात आहे. या नव्या बदलांमुळे येत्या काळात परीक्षा पद्धती, परीक्षांचे स्वरूप, परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांचे मूल्यमापन आणि यासोबतच त्या मूल्यमापनाद्वारे काढण्याचे निष्कर्ष यामध्ये बदल होणार आहेत. शिवाय मूल्यमापन आणि त्यातील निष्कर्ष आदींमध्येही सुधारणा होणार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्याचा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा आराखडासुद्धा सुधारण्यात येत असल्याची माहिती संचालक रेखावार यांनी दिली.

..
शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार
‘एनसीआरटी’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ‘एससीईआरटी’कडून राज्यातील तज्ञांची मते जाणून घेऊन यामध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. हे करीत असताना २१व्या शतकात लागणारी विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि प्रत्येक विषयासाठी, प्रत्येक मुद्द्यासाठी सर्व प्रकारच्या प्रश्नांची ओळख आणि सराव विद्यार्थ्यांचा होईल, याचा प्रयत्न या मूल्यमापनातून करण्यात येणार आहे. यासाठी सध्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. या नव्या प्रक्रियेतून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी एक मोठा मार्ग मोकळा होणार असल्याचेही ‘एससीआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

IPL म्हणजे बिझनेस, मनोरंजन... क्रिकेट नाहीच! काव्या मारनच्या संघातील सदस्याचा मोठा दावा; म्हणाला, इथे खेळाच्या विकासापेक्षा...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर तहसील येथे चर्मकार समाजाचे निदर्शने करत आंदोलन

ट्रेन बुकिंग बनले आणखी सोपे! Cleartrip आणि IRCTC ची पार्टनरशिप; पाहा तिकीट कसं मिळवायचं? एका क्लिकमध्ये

Maharashtra Result Day : राज्य मंडळाचा नवा निर्णय; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना निकालासोबत उत्तरपत्रिकाही मिळणार

SCROLL FOR NEXT