राज्यात कोविडच्या ४७ नवीन रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, शनिवारी (ता. २४) एकूण ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३०, पुणे सात, नवी मुंबई तीन, ठाणे सहा, नागपूरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे, तर २४ मेपर्यंत मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. यात मुंबईतील तीन, तर ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ७,१४४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी २५७ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत २१३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ८७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.