मुंबई

ठाणे स्थानकावरील शौचालयांची तोडफोड; समाजकंटकांचा धिंगाणा, प्रवाशांचे हाल

CD

समाजकंटकांचा ठाणे स्थानकात धिंगाणा,
शौचालयांची तोडफोड; प्रवाशांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : ठाणे रेल्वेस्थानकावरील सार्वजनिक शौचालयांवर समाजकंटकांनी अक्षरशः कहर केला असून, गुरुवारी (ता. २३) रात्री मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून, सार्वजनिक स्वच्छता सुविधांचे तीनतेरा वाजले आहेत. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित समाजकंटकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तोडफोडीमुळे कल्याण टोक असो किंवा प्लॅटफॉर्मचा मध्यभाग अनेक शौचालये तुटलेली, तुंबलेली आणि पूर्णपणे वापरात अयोग्य झाली आहेत. रेल्वे प्रशासन सध्या दुरुस्तीच्या कामात गुंतले असले, तरी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही तोडफोड केवळ सार्वजनिक सुविधांचे नुकसान नसून, हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी आणि सुविधेशी थेट खेळण्याचा प्रकार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हणत ज्यांच्याकडे या तोडफोडीमागील गुन्हेगारांची माहिती आहे, त्यांनी तातडीने ठाणे रेल्वे अधिकारी अथवा रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT