ग्रँडमस्टर प्रज्ञानंदशी खेळण्याची संधी
मुंबई, ता. २५ : आयटीसीच्या क्लासमेटने बाजारात आणलेल्या एज्युगेम्स इन्फिनिटी या वहीच्या साह्याने शाळकरी मुले बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि वैशाली यांच्यासह बुद्धिबळ आणि शब्दकोडी आदी खेळ खेळू शकतात.
यासाठी विद्यार्थ्यांना त्या वहीचे शेवटचे पान स्कॅन करावे लागेल. ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि वैशालीदेखील ३० दिवसांसाठी एज्युगेम्स इन्फिनिटीमध्ये सहभागी होतील. या उपक्रमामुळे शब्दकोड्यांच्या साह्याने मुलांचे ज्ञान वाढेल आणि ती मुले बुद्धिवादी, एकाग्र आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होतील, असे आयटीसीचे विकास गुप्ता म्हणाले. या स्पर्धेत मुलांना विविध बक्षिसांसह हाँगकाँग डिस्नेलँडच्या सहलीला जाण्याची संधीदेखील मिळेल. या स्पर्धेत मुंबई, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरांमधील तसेच देशातील ३० शहरांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.