मुंबई

टाटाची अल्ट्रोज ६.८९ लाख रुपयांपासून

CD

टाटाची अल्ट्रोज ६.८९ लाख रुपयांपासून

मुंबई, ता. २५ : टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या मोटारीची किंमत सहा लाख ८९ हजार रुपयांपासून असल्याचे जाहीर केले आहे.
आकर्षक डिझाईन, आलिशान इंटीरियर आणि प्रगत वैशिष्ट्ये, अद्वितीय सुरक्षा आणि कार्यक्षमता ही या मोटारीची वैशिष्ट्ये आहेत. या मोटारीला सुरक्षेचे फाइव्ह स्टार जीएनसीएपी मानांकन मिळाले आहे. आकर्षक डोअर हँडल, एलईडी टेल लॅम्प, लुमिनेट एलईडी हेडलॅम्प, गाडीच्या आत सुरक्षित हाय सपोर्ट सॉफ्ट डॅशबोर्ड, आकर्षक लाइटिंग आणि व्यवस्थित जागा यामुळे उत्साहवर्धक अनुभव मिळतो, असे टाटा मोटर्सचे शैलेश चंद्रा म्हणाले.
तिच्या आधुनिक डिझाईनमुळे एरोडायनामिक्समध्ये वाढ झाली आहे. सराउंडिंग व्ह्यू कॅमेरासह ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरदेखील मोटारीत आहे. इलेक्ट्रिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ॲप्पल कार प्ले, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर अँड एक्स्प्रेस कूलिंग इत्यादी ५० वैशिष्ट्ये यात आहेत. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या इंधनांवर ही गाडी चालेल. सुरक्षा व्यवस्थेसाठी आत सहा एअरबॅग असतील. या मोटारीच्या विविध मॉडेलच्या किमती ११ लाख २९ हजार रुपयांपर्यंत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporators Not Reachable : विधानपरिषदेचे राजकारण तापलं! काँग्रेसचे ५० ते ६० नगरसेवक नॉट रीचेबल, भाजप आमदाराचा दावा

12 Years of PM Modi नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर किती होते?

Blood Group Stroke Risk: ‘या’ रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा जास्त धोका? वाचा शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं काय

Ganga Dussehra: वर्षातून एकदा होतो गंगा आणि नर्मदेचा संगम! काय आहे 'भयडा प्रसाद' आणि त्याची रेसिपी?

Mumbai: महापालिका जागा सील करू शकत नाही, थकीत मालमत्ता कर वसूलीवर न्यायालयाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT