मुंबई

उच्च रक्‍तदाबाचा धोका वाढतोय!

CD

उच्च रक्‍तदाबाचा धोका वाढतोय!
मुंबईसह राज्‍यात साडेपाच लाख लोक त्रस्त; जीवनशैलीत बदल आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : उच्च रक्‍तदाबाची समस्‍या झपाट्याने वाढत असून, यावर्षी आतापर्यंत राज्य आरोग्य विभागाने केलेल्या ३० वर्षांवरील लोकांच्या तपासणीत साडेपाच लाख लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाच्या मते, राज्यातील प्रत्येक तिसरा व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. मुंबईतील ३४ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्‍या सतावत आहे.
डॉक्टरांच्या मते, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पुरेशी झोप न मिळाल्याने उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, २०२४-२५ मध्ये, ३० वर्षांवरील एक कोटी ३६ लाख ४५ हजार ९९४ लोकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. यापैकी २३ लाख ८७ हजार ३०८ लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत. यावर्षी १६ मेपर्यंत ३१ लाख २३ हजार ९२१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी पाच लाख १० हजार ६३२ लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.

४९ टक्के मुंबईकर सहा तास झोपत नाहीत
डॉक्टरांच्या मते, निरोगी राहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने किमान सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे, पण तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहे. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होते. एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ४९ टक्के मुंबईकर सहा तासांचीही झोप घेत नाहीत. सर्वेक्षणात सात टक्के लोकांनी सांगितले की, ते फक्त चार तास झोपतात. दोन टक्के लोकांनी सांगितले की, आठ ते १० तास ते झोपतात. याचाच अर्थ, ५० टक्क्यांहून कमी नागरिक सहा तासांपेक्षाही कमी झोप घेतात.

कोविडमुळे फुप्फुसे कमकुवत
फुप्फुसीय उच्च रक्तदाबतज्ज्ञ डॉ. प्रशांत बोभाटे म्हणाले की, हा हृदय आणि फुप्फुसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे. बोभाटे यांच्या मते, कोविडमुळे लोकांच्या फुप्फुसांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फुप्फुसीय उच्च रक्तदाबाच्या प्रकरणांमध्ये १५० टक्‍के वाढ दिसून येत आहे. गट तीनमध्ये येणाऱ्या ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये या आजाराची वाढ दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

फुप्फुसीय उच्च रक्तदाबाचे प्रकार
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, फुप्फुसीय उच्च रक्तदाब अनेक गटांमध्ये विभागला आहे. डॉ. बोभाटे म्हणाले की, या आजाराचा ग्रुप-वन सर्वात घातक आहे. १५ ते ३० वयोगटातील लोकांना याचा त्रास होतो. या प्रकरणांमध्ये, आजाराचे कोणतेही कारण माहीत नसते, ज्याला वैद्यकीय भाषेत इडिओपॅथिक पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतात. या गट-एकमध्ये जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या मुलांचादेखील समावेश आहे. बालपणात या आजाराचे निदान झाले नाही, तर पुढे जाऊन त्यांना फुप्फुसीय उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, हृदयाचे ठोके वाढणे, घोटे आणि पोटात सूज येणे इत्यादी लक्षणे आहेत.

मुंबईकर जास्त मीठ खातात
जागतिक आरोग्य संघटना आणि महापालिका आरोग्य विभागाने संयुक्तपणे केलेल्या स्टेप सर्वेक्षण २०२१ नुसार, मुंबईतील ३४ टक्‍के लोकांना उच्च रक्तदाब तर १८ टक्‍के लोकांना मधुमेह झाल्याचे निष्पण्ण झाले. या अहवालानुसार, भारतीय शिफारस केलेल्या पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात, तर मुंबईकर दररोज जेवणात ९ ग्रॅम मीठ वापरतात.

मुंबईतील नव्या पिढीला मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या आजारांपासून वाचवण्यासाठी महापालिका आता ‘मीठ आणि साखर जनजागृती’ मोहीम सुरू करत आहे. याअंतर्गत लहान वयातच निरोगी सवयी विकसित करण्यावर भर दिला जाईल.
- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT