मुंबई

भुयारी मेट्रोचे चाक चिखलात!

CD

भुयारी मेट्रोचे चाक चिखलात!
तिकीट खिडकी, जिन्यासह फलाटावर राडारोडा; सेवा पूर्ववत होण्यास आठ-दहा दिवस लागणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : भुयारी मेट्रो-३चे चाक पुरते चिखलात रुतले आहे. वरळीच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात सोमवारी (ता. २६) पावसामुळे शिरलेल्या पाण्यामुळे येथील तिकीट खिडकी, जिन्यासह फलटावर मोठ्या प्रमाणात राडारोडा पसरला आहे. तो काढण्याचे काम ‘एमएमआरसीएल’कडून युद्धपातळीवर सुरू असले तरी पाण्यामुळे बाधित झालेली सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यरत होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे या स्थानकातील सेवा पूर्ववत होण्यास आठ-दहा दिवस लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मुंबईत सोमवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे वरळी येथील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगतच्या सांडपाणीनिस्सारण नाल्यातील पाण्याच्या दाबामुळे आचार्य अत्रे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेली वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानकात दुर्गंधीयुक्त पाण्यासह चिखलाचे साम्राज्य पसरले. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशने लिमिटेडने (एमएमआरसीएल) युद्धपातळीवर काम करीत हे पाणी बंद केले असले तरी फलाट, जिना आणि तिकीट खिडकी परिसरात जमा झालेला राडारोडा काढण्यास वेळ लागत आहे. तसेच स्वयंचलित प्रवेशद्वारासह इतर विजेवर चालणारी यंत्रणा सुरू करण्यास वेळ लागणार असल्याची माहिती ‘एमएमआरसीएल’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मेट्रो-३ मार्गावर सध्या आरे ते वरळीदरम्यान नियमित सेवा सुरू असून केवळ वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानकादरम्यानची सेवा बंद असून ती पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे ‘एमएमआरसीएल’ने स्पष्ट केले आहे.


...
दुर्गंधीने कर्मचारी त्रस्त
आचार्य अत्रे चौक मेट्रोस्थानकात पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणीनिस्सारण नाल्यातील पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या दुर्गंधीने राडारोडा काढण्याचे काम करणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे साफसफाईच्या कामाला वेळ लागत आहे. त्यातच हे पाणी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथक कार्यरत आहे; मात्र पाण्यामुळे वीजपुरवठा सुरू करणे शक्य नाही. परिणामी, चिखलाबरोबरच सफाईच्या कामासाठी मशीनच्या वापरावर मर्यादा येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT