रेल्वेसेवा पूर्वपदावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने सोमवारी (ता. २६) मुंबईकरांची दाणादाण उडाली. यामध्ये मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन सेवा विस्कळित झाली; मात्र पावसाने उघडीप घेतल्याने मंगळवारी (ता. २७) तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत सुरू होती. सोमवारी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील भांडुप, विक्रोळी तर हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल, वडाळा, टिळक नगर यांसारख्या सखल भागात पावसामुळे पाणी साचून लोकल विस्कळित झाली. त्यामुळे ठाणे, गोरेगाव, मानखुर्दपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सकाळीच ठप्प झाली होती, मात्र मंगळवारी विना व्यत्यय रेल्वेसेवा सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.