मुंबई

सखल भागातील उपसा पंप काढले

CD

सखल भागातील उपसा पंप काढले
आमदार अजय चौधरी यांचा पालिकेवर आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सखल भागात वॉटर पंप लावले जातात; मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात शिवडी मतदारसंघातील अनेक पंप काढून टाकण्यात आले असून, त्यामुळे जागोजागी पाणी तुंबल्याचा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला आहे. कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे पावसात मुंबईकरांचे हाल झाल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

मुंबईत सोमवारी (ता. २६) झालेल्या मुसळधार पावसाने बऱ्याच परिसरात पाणी तुंबले.अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले. लालबाग, परळ, वडाळा, शिवडी येथील परिसरदेखील जलमय झाले. खरेतर पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी महापालिका उपसा पंप लावते; मात्र यंदा याकडे पालिकेने दुर्लक्ष केले. त्यातील काही पंप कार्यान्वित करण्यात आले, पण काही पंप काढून टाकण्यात आले. ही बाब निदर्शनास आली असता आमदार अजय चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहत पाणी उपसा पंप न काढण्याची विनंती केली होती, मात्र पालिकेने हे पंप काढल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

..
कार्यालयात बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मुंबई पाण्यात गेली. उपसा पंप न काढण्याचे पत्र मी पालिकेला दिले होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक पंप काढण्यात आले. पाणी तुंबल्याने भानावर आलेल्या अधिकाऱ्यांनी आता पुन्हा एकदा पंप बसवण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांना आता तरी शहाणपण येईल, अशी अपेक्षा आहे.
- अजय चौधरी, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT