राज्यात कोविडच्या नव्या ६६ रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, मंगळवारी (ता. २७) राज्यभरात एकूण ६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३१, पुणे १८, ठाणे सात, नवी मुंबई चार, पनवेल तीन, नागपूर दोन, सांगली येथे एक रुग्ण आढळून आला. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ८,२८२ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी ४३५ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत ३१६ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत १०६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.