मुंबईत पावसाची उसंत
मुंबई : काही तुरळक सरी वगळता मुंबईकडे पावसाने मंगळवारी (ता. २७) पाठ फिरवली. हवामान विभागाने मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता; मात्र हा अंदाज फोल ठरला. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज शहर भागात १६.६ आणि पश्चिम उपनगरांत केवळ १.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे कमाल तापमान अनुक्रमे २६.८ आणि २७.८ अंश सेल्सिअस इतके होते. तर आर्द्रता अनुक्रमे ९५ आणि ८९ टक्के असल्याने उष्मा जाणवला. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरांत साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात वाढ अपेक्षित असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.