तुमच्यातील कलाकार असाच जिवंत ठेवा
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे पालिका कर्मचाऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ‘मुंबई महापालिका ही खूप मोठी कर्तव्यदक्ष आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेत जितके हुशार, कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत, तितकेच हरहुन्नरी कलाकारही या कर्मचाऱ्यांमध्ये दडलेला आहे. रोजचे काम सांभाळून आपल्यातील कला सादर करणे, हे खूप मोठे आव्हान आहे. तुमच्यातील कलाकार असाच जिवंत ठेवा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा,’ असे आवाहन पद्मश्री, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी पालिका कर्मचाऱ्यांना केले.
महापालिका कामगार विभागाच्या विद्यमाने आयोजित ५३व्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा २०२४-२५चा पारितोषिक वितरण अशोक सराफ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी विलेपार्ले येथे पालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. या वेळी अशोक सराफ म्हणाले, की ‘मी अनेक कार्यक्रमांना जातो. वेगवेगळी स्नेहसंमेलने पाहतो; परंतु इतका रेखीव आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मी याआधी पाहिला नाही, या प्रत्येक कलाकाराच्या कृतीमागे खूप उत्साह दिसून आला. कर्तव्याची जाणीव असलेला प्रत्येक कर्मचारी जितका आपल्या कामाला न्याय देतो, तितकाच त्याने आज या रंगमंचावर आपल्या कलेलादेखील न्याय दिला.’ तर अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, की ‘महापालिकेत गुणी आणि कलासक्त कर्मचारी आहेत. या सर्व कलावंत कर्मचाऱ्यांना महापालिकेचे सतत सहकार्य असते, प्रशासनदेखील त्यांना पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे उत्कृष्ट नाटके दरवर्षी सादर होतात. राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेसाठीदेखील प्रवेशिका पाठवल्या जातात. महापालिका एक विस्तृत कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकाच्या प्रतिभेचा गौरव केला जातो.’
...
‘कायप्पाचा पाडा’ला प्रथम पारितोषिक
यंदाच्या नाट्य स्पर्धेत महापालिकेच्या नायर रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कायप्पाचा पाडा’ या नाटकाला मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर मानसी जोशी यांना याच नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आणि राजा शिंगाडे यांना ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय विविध गटांत ३० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.