‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल
एक लाख सहा हजार ८६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी
मुंबई, ता. ३१ ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय ४१९ आणि खासगी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या ५८८ अशा एकूण १,००७ आयटीआयमधील प्रवेशासाठी आजपर्यंत तब्बल १ लाख ६ हजार ८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ९५ हजार ८९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पूर्ण भरून झाले असून, ९३ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी यासाठीच्या प्रवेशाचे शुल्कही अदा केले आहे.
राज्यातील शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये १५ मेपासून प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. तर मागील चार दिवसांपासून दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळत असल्याने आयटीआयच्या प्रवेशाची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.
आयटीआयच्या प्रवेशासाठी राज्यभरात admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी सुरू असून, यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी शासकीय आयटीआयमध्ये मार्गदर्शन केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. तसेच शिक्षक, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जात आहे.
शनिवार, ३१ मेपर्यंत १ लाख ६ हजार ८६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यातील ९५ हजार ८९८ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पूर्ण भरून झाले असून, ९३ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी यासाठीच्या प्रवेशाचे शुल्कही अदा केले तर यातील ४९ हजार ७३१ विद्यार्थ्यांचे आयटीआयही निश्चित झाले आहेत.
१६ जूनपर्यंत करा अर्ज
आयटीआय प्रवेशासाठी १६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता प्रवेश अर्ज करणाऱ्याची संख्या संख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.