मुंबई

आरोग्य विभागाचा निधी जातो कुठे : वर्षा गायकवाड

CD

आरोग्य विभागाचा निधी जातो कुठे? वर्षा गायकवाड

मुंबई, ता. ३१ : महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्यसेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधादेखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता. ३१) वांद्रे येथील भाभा रुग्णालयाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. या वेळी गायकवाड म्हणाल्या, ‘वांद्रे पश्चिम येथे के. बी. भाभा रुग्णालयाचे कॅथलॅब, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, कार्डियाक व ब्लड बँक या सुविधा पुरवल्याशिवाय उद्‍घाटन होणार नाही, अशी ग्वाही महापालिकने दिली होती; परंतु आजपर्यंत या सुविधा सुरू झालेल्या नाहीत. या ठिकाणी पुरेसे डॉक्टरही नाहीत. रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नाहीत. मधुमेह, ब्लड प्रेशरच्या औषधांचा तुडवडा आहे. २०२४-२५मध्ये औषधांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती यावर्षी कमी करून सहा कोटी रुपये केली आहे. १४ महिन्यांपासून औषधांच्या निविदा काढलेल्याच नाहीत. सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या तपासण्यांसाठी या उपनगरी रुग्णालयांमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा तपासण्यांची गरज भासल्यास रुग्णांना मोठा खर्च करून बाहेर जावे लागते.’

..
मुंबईची ‘तुंबई’ करणाऱ्यांवर कारवाई कधी?
खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (ता. ३) मिठी नदीचीही पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिका व राज्य सरकारच्या कामावर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘महापालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केले आहे की, यावर्षी मिठी नदीची सफाई केवळ ५५ टक्के पूर्ण झाली आहे. संपूर्ण मुंबईत नाल्यांची सफाई पाहिली तर ती केवळ ६८ टक्के पूर्ण झाली आहे. पालिका प्रशासन आणि सरकारच्या हलगर्जीमुळे मुंबईकरांना पूरस्थितीची समस्या अजून किती काळ सहन करावी लागणार आहे? या बेजबाबदारपणाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार?’, अशी विचारणा खासदार वर्षा गायकवाड यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT