‘तत्काळ गाडी हवी तर अतिरिक्त पैसे भरा’
उबेरला नोटीस देऊनही ओला आणि रॅपिडोकडून लूट सुरूच
मुंबई ग्राहक पंचायतीकडून तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : तत्काळ गाडी हवी तर अतिरिक्त पैसे भरा, यासाठी केंद्रीय ग्राहक सेवा विभागाने उबेरला नोटीस दिली होती. त्यापासून ओला आणि रॅपिडोने धडा घेतला नाही. दोन्ही कंपन्याकडून लूट सुरूच आहे. याप्रकरणी मुंबई ग्राहक पंचायतीकडून केंद्रीय ग्राहक सेवा विभागाला तक्रार केली आहे.
ॲप आधारित कंपन्यांची वाहन बुक करताना ग्राहकांना काही वेळ वाहन उपलब्ध नसल्याचे दाखवण्यात येते. तत्काळ गाडी हवी तर आगाऊ टीप भरा, अशी मागणी केली जाते. त्यामध्ये १० ते ५०, ३० ते ९० यामध्ये मागणी केली जाते. उबेरकडूनही अशी मागणी केली होती. त्यावर मुंबई ग्राहक पंचायतीकडून केंद्रीय ग्राहक सेवा विभागाला तक्रार केली असता, उबेरला नोटीस दिली होती.
टीपशिवाय कॅब बुकच होत नसल्याचा अनुभव
ओला, उबेर, रॅपिडो, ब्ला ब्ला, मेरू, कूल कॅब अशा अनेक कंपन्या हल्ली खासगी प्रवासी वाहतूक सेवा पुरवतात. या कंपन्यांच्या मोबाईल ॲपमधून ग्राहकांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी कॅब बुक करायची. त्यावर कंपनीकडून ठरवण्यात आलेलं भाडं दाखवण्यात येईल आणि प्रवास संपल्यावर ग्राहकानं रोख किंवा ऑनलाइन स्वरूपात ते द्यायचं, अशी साधारण प्रक्रिया असते. कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून ओला आणि रॅपिडो कॅब बुक करतानाच टीप देण्यासंदर्भातला पर्याय ग्राहकांना दर्शवला जातो. हे टीप देणं जरी ऐच्छिक असलं तरी टीप दिल्याशिवाय कॅब बुकच होत नसल्याचा अनुभव येत आहे.
ग्राहकांना लवकरच कॅब किंवा ऑटो घ्यायचे असल्यास अधिक पैसे देण्यास भाग पाडण्याच्या ओला आणि रॅपिडो पद्धतीची मी तक्रार करीत आहे. ऑटोसाठी १० ते ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. ही अत्यंत अन्यायकारक पद्धत आहे आणि कॅब/ऑटो वापरणाऱ्या संपूर्ण ग्राहक वर्गावर याचा परिणाम होत आहे. सीसीपीए सर्व उबेर, ओला, रॅपिडो यांना अशा अन्याय पद्धतीचा अवलंब करण्यापासून तत्काळ रोखेल, अशी अपेक्षा आहे.
- शिरीष देशपांडे, अध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.