मुंबई

इफको

CD

‘इफको’ला ३,८११ कोटींचा करपूर्व नफा
मुंबई, ता. ३१ : सहकारी संस्था इफकोने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ३, ८११ कोटी रुपयांचा करपूर्व नफा नोंदवला असून, त्यांच्या नॅनो खतांच्या विक्रीत ४७ टक्के वाढ झाली आहे.
या वर्षात इफकोने नॅनो खतांच्या ३६५ लाख बाटल्यांची विक्री केली. मागील आर्थिक वर्षात ही संख्या २४९ लाख बाटल्या एवढी होती. यावर्षी त्यांच्या इफको नॅनो डीएपीने विक्रीमध्ये सर्वाधिक ११८ टक्क्यांनी वाढ नोंदविली. या आर्थिक वर्षात इफकोची उलाढाल ४१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी यांनी ही माहिती दिली.
गेली तीन वर्षे संस्थेने तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली आहे‌. तसेच गेली २३ वर्षे इफकोने सभासदांना भरणा झालेल्या भाग भांडवलावर दरवर्षी २० टक्के लाभांश दिला आहे. या वर्षात इफको नॅनो खतांपैकी नॅनो युरिया प्लस लिक्विडच्या २६८ लाख बाटल्या विकल्या, तर नॅनो डीएपीचा ९७ लाख बाटल्या विकल्या. इफकोच्या सागरिका ग्रॅन्युअल खतांनी जवळपास दोन लाख मॅट्रिक टन विक्री नोंदवली. सागरिका लिक्विडची विक्री ११ लाख लिटर असून, त्यात ३३ टक्के वाढ झाली. तर सागरिका ग्रॅन्युअलची विक्री ६८ हजार मॅट्रिक टन असून, त्यात २८ टक्के वाढ झाली. जैविक खतांची विक्री ८.६१ लाख लिटर झाली, असे इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी म्हणाले. ‌
लवकरच मुळावाटे देण्यासाठी ग्रॅन्युअल स्वरूपात नॅनो एनपीके खत बाजारात येईल. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढेल. इफकोच्या नॅनो खातांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असून ब्राझील, केनिया, अमेरिका यासारख्या देशांनी नॅनो तंत्रज्ञान स्वीकारण्यात रस दाखवला आहे. इफकोचे अस्तित्व ४० हून अधिक देशांमध्ये असून अमेरिका, ब्राझील, स्लोव्हेनिया, मॉरिशस, झांबिया, नेपाळ, बांगलादेश येथे त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. इफकोच्या कळोल युनिटमध्ये सीड इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT