राज्यात कोविडच्या नव्या ६५ रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून, रविवारी (ता. १) एकूण ६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक २२, ठाणे नऊ, पुणे २५, पिंपरी चिंचवड सहा, कोल्हापूर दोन, नागपूरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे, तर १ जूनपर्यंत मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ११,५०१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी ८१४ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात रविवारी सक्रिय रुग्ण ५०६ आहेत; त्यात एकट्या मुंबईत ४६३ रुग्ण आढळून आले. यामध्ये आतापर्यंत ३०० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशातदेखील दिसून येत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.