मुंबई

मराठीच्या सामर्थ्यांसाठी बालसाहित्य, कुमार साहित्याची नितांत गरज

CD

मराठीच्या सामर्थ्यांसाठी बालसाहित्य, कुमार साहित्याची नितांत गरज
राज्य मराठी विकास संस्थेच्या संवाद सत्रात मान्यवरांचा सूर
मुंबई, ता. ११ : मराठी शाळांसोबतच उच्च शिक्षित कुटुंबांच्या घरांतून मराठी भाषा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. अनेक कुटुंबांमध्ये मराठीतून संवाद होत नाहीत, दुसरीकडे शिक्षणाच्या क्षेत्रातही मराठी भाषेचे मोठ्या प्रमाणात पीछेहाट होत आहे. ती रोखण्यासाठी मराठी भाषेच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून मराठीच्या सामर्थ्यासाठी बालसाहित्य, कुमार साहित्य आदी अनेक प्रकारच्या साहित्याची निर्मिती करण्याची गरज राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या विकसित महाराष्ट्र व्हिजनच्या पार्श्वभूमीवरील संवाद सत्रात भाषा, साहित्य आदी क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
विकसित महाराष्ट्र व्हिजन‍ २०४७ च्या पार्श्वभूमीवर या व्हिजनच्या विविध टप्प्यांच्या तयारीसाठी राज्य मराठी विकास संस्थेने देशभरातील साहित्य, भाषा आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या संवाद सत्राची ऑनलाइन बैठक बोलावली होती. या सत्राचे आयोजन मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ यांनी केले होते. यात विविध राज्यातील मान्यवरांनी सहभाग नोंदवत मराठी भाषा, साहित्य, मराठी शाळा आणि शिक्षणासंदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. यात बेळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. शोभा नाईक, राज्यातून सुनिला गोंधळेकर, प्रकाश कुलकर्णी, रेणू दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शोभा नाईक म्हणाल्या, शिक्षणाच्या क्षेत्रातील मराठीची पीछेहाट रोखण्यासाठी मराठी भाषेसाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी इंग्रजीचे वर्चस्व रोखण्यासाठी नव्याने शैक्षणिक धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेतले सत्व सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व त्याचे सामर्थ्य प्रभावीपणे अभ्यासक्रमातून मांडून ते सर्वांना पुरवले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
पालकांची मानसिकता घरात मराठी बोलण्यासाठी असायला हवी, त्या माध्यमातून किमान घरात तरी मराठी बोला यासाठी उपक्रम राबवण्याची गरज सुनीला गोंधळेकर यांनी व्यक्त केली. दामोदर काळे म्हणाले, आज जिल्हा परिषदेच्या शाळा एकीकडे कमी होत असून, भाषेच्या विषयाचे समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, बंगाली साहित्याप्रमाणे मराठीतही चांगल्या साहित्याचे प्रकल्प हाती घेण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषेचा विकास करण्यासाठी श्रवण वाचन लेखन या चार टप्प्यावर काम करावे लागेल, असे मत रेणू दांडेकर यांनी व्‍यक्‍त केले. यासोबतच अभिजात मराठी, मराठी शाळा आणि मराठीच्या विकासासाठी प्रांजल चोबे, प्रभाकर देसाई, कल्याणी वाघ, जिजा शिंदे, प्रज्वल वाघमोडे आदींनीही अनेक सूचना करत आपली मते मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT