मुंबई

भरधाव कारमुळे अंमली पदार्थ कारखान्याचा सुगावा

CD

भरधाव कारमुळे अमली पदार्थ कारखान्याचा सुगावा

मुंबई, ता. ११ : अंधेरीच्या पंपहाउस चौकातून रात्री बाराच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या लाल रंगाच्या आलिशान कारने गस्तीवरील एमआयडीसी पोलिसांचे लक्ष वेधले. रस्त्यावर हेलकावे घेत पुढे निघालेली ही कार पोलिसांनी रोखत चालकाची चौकशी सुरू केली. यातून तारापूर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आणि तेथे तयार झालेल्या अमली पदार्थ विक्रीच्या महानगर प्रदेशात पसरलेल्या साखळीचा सुगावा पोलिसांना लागला.

गस्तीवरील उपनिरीक्षक महेंद्र खांगळ यांनी शनिवारी (ता. ७) रात्री ही संशयित कार रोखली. या वेळी कारचालक फरहान खान याच्याकडे त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा फरहानची उलटसुलट उत्तरे आणि अस्वस्थतेमुळे खांगळ यांचा संशय बळावला. त्यांनी फरहानला थेट पोलिस ठाण्यात आणले आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उभे केले. पोलिस ठाण्यात येताच फरहानची ओळख उलगडली. फरहान अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी त्याची आणि त्याच्या गाडीची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना ७१ ग्रॅम एमडी सापडले. त्याला लगोलग अटक करण्यात आली. चौकशीत त्याला एमडीचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्या प्रतीक जाधव याचे नाव समोर आले. पेशाने वाहनचालक असलेल्या प्रतीकचा शोध घेण्यासाठी उपआयुक्त दत्ता नलावडे यांनी अंधेरी एमआयडीसी पोलिसांची विविध पथके तयार केली. कौशल्यपूर्ण तपास करून पथकांनी जाधव यास अटक केली. त्याच्याकडे २१५ ग्रॅम एमडी साठा सापडला. पोलिसांनी जाधव याची कसून चौकशी केल्यावर तारापूर एमआयडीसीत प्रोकेम फार्मास्युटिकल लॅबची माहिती मिळाली.

आरोपीची रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी
प्रोकेम फार्मास्युटिकल लॅबमध्ये विजय खटके (वय ४३) नावाची व्यक्ती एमडीचे उत्पादन घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने या लॅबवर छापा घातला. तेथे खटके आणि त्याचा कारखाना पोलिसांच्या हाती लागला. खटके याने रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रसायनांची जाण असल्याने खटके याने एमडीसाठी प्रयोग सुरू केले ते यशस्वी झाल्यावर त्याने जाधवकरवी मुंबई महानगर प्रदेशात एमडी विक्रीसाठी साखळी तयार केली. विजय खटके याला मंगळवारी (ता. १०) अटक करण्यात आली. त्याने या प्रयोगशाळेत विक्रीसाठी तयार करून ठेवलेला सुमारे २८० ग्रॅम अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: रियान परागवर बंदी? ड्रेसिंगरूममध्ये 'व्हॅपिंग' करताना दिसला; BCCI कठोर कारवाईच्या तयारीत

Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

SCROLL FOR NEXT