मुंबई

वांद्रे मॉल आगीसंदर्भातील चौकशी अहवाल सादर

CD

वांद्रे मॉल आगीसंदर्भातील चौकशी अहवाल सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वांद्रे (पश्चिम)स्थित लिंक स्क्वेअर मॉलला २९ एप्रिलला आग लागली होती. या आगीसंदर्भातील चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारशी मंजूर करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले आहेत. चौकशी अहवालाची प्रत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वांद्रे (पश्चिम) येथील ३३व्या रस्त्यावरील लिंक स्क्वेअर मॉलला २९ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून ५८ मिनिटांनी आग लागली. आगीची बातमी कळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास २१ तास ४३ मिनिटे लागली. आगीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार सहआयुक्त (दक्षता) डी. गंगाथरण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला.
दरम्यान, या चौकशी अहवालाची प्रत महानगरपालिकेचे संकेतस्थळ https://portal.mcgm.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर ‘नवीन’ या सदरामध्ये हा अहवाल पाहता येणार असल्याचे माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT