धार्मिक पर्यटनात सहभागी व्हा
टूर्स अँड ट्रॅव्हल्सना परिवहन मंत्र्यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी खासगी टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्यात, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते.
या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सर्व खातेप्रमुख यांच्यासह खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, ‘राज्यातील गोरगरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसांत सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशा वेळी एसटीने खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल.
...
श्रावण महिन्यापासून सुरुवात
खासगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्र्यंबकेश्वर-नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.