अमेरिकन दूतावासात बॉम्बची अफवा
व्हिसा नाकारल्याने गतिमंद तरुणाचे कृत्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः व्हिसा नाकारल्याने रागाच्या भरात वांद्रे-कुर्ला संकुल येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास इमारतीत बॉम्बस्फोट होईल, अशी अफवा पसरवणाऱ्या गतिमंद तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तरुणाने शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दूरध्वनी करून ही धमकी दिली होती.
दूतावासाला धमकी मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेच वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक नाशक आणि श्वान पथकासह दूतावासात धाव घेत संपूर्ण परिसर तपासला; मात्र आक्षेपार्ह वस्तू, स्फोटके न आढळल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, दूतावासाने अलीकडच्या काळात व्हिसा नाकारण्यात आलेल्यांची यादी पोलिसांना देण्यात आली. तांत्रिक तपासाआधारे पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या तरुणाचा शोध लावला. त्याला नोटीस जारी करून चौकशीसाठी बोलावण्यात आले. पुढे हा तरुण गतिमंद असल्याचे पोलिसांना समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.