वृद्ध विधवा आईला मारहाण, मानसिक छळ
व्यसनी तरुणाविरोधात गुन्हा
मुंबई, ता. १६ ः अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाने विधवा आईस मारहाण करून, धमकावून तिच्या नावे असलेली सारी मालमत्ता, दागदागिने विकण्यास भाग पाडून जवळपास रस्त्यावर आणून सोडले. मात्र, तरीही पैशांची मागणी आणि त्यासाठीचा मानसिक छळ न थांबल्याने अखेर या वृद्धेने मुलाविरोधात पोलिस तक्रार केली. त्याआधारे खार पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा नोंदवला.
आयेशा सिद्दिकी (वय ७३) असे या वृद्धेचे नाव आहे. तिचे पती आरिफ यांचा २०२१ मध्ये मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांचा फर्निचर, पितळी पुतळे, कार्पेटचा व्यवसाय होता. ही साहित्य ते चित्रपट निर्मितीसाठी भाड्याने देत. मृत्यूनंतर हा व्यवसाय आयेशा यांनी सुरू ठेवला. हे साहित्य त्यांनी जोगेश्वरीतील बेहरामबाग येथील ७५० फुटांच्या गोदामात ठेवले होते. मात्र, व्यसनी मुलगा आदिलने गोदामातील एकेक वस्तू परस्पर विकल्याचे आयेशा यांचा व्यवसाय ठप्प पडला. पुढे त्याने हे गोदाम, खार येथील दोन आलिशान फ्लॅट, घरातील दागदागिने आयेशा यांना मारहाण करून विकण्यास भाग पाडले. याशिवाय वेळोवेळी आयेशा यांना परिचित व्यक्तींकडून लाखो रुपये उसने घेण्यास भाग पाडले.
याप्रकरणी आदिल विरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण व कल्याण अधिनियम, भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याचे खार पोलिसांनी सांगितले. आदिल याने वृद्ध आईलाच नव्हे; तर पत्नी आणि दोन मुलांनाही वाऱ्यावर सोडून दुसरा विवाह केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.