मुंबई

रेल्वे वाहतुकीला पावसाचा फटका

CD

रेल्वे वाहतुकीला पावसाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पावसाची रिपरिप सोमवारी दिवसभर सुरूच राहिल्याने उपनगरीय रेल्वेचा वेग काहीसा मंदावला होता. यामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दुपारपासून ठाणे-कल्याण भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेतील दृश्‍यमानता कमी झाल्याने लोकलच्या वेगावर परिणाम झाला. दृश्‍यमानता कमी असल्याने लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने मोटरमनला दिल्या होत्या. परिणामी लोकलच्या एकामागोमाग एक रांगा लागल्या. कल्याण ते सीएसएमटीदरम्यानच्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावू लागल्याने लोकलला प्रवाशांची एकच गर्दी झाली. लोकल धीम्या गतीने धावू लागल्याने अनेक स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकानंतर लोकलचा वेग मंदावला होता. त्यामुळे पनवेल ते सीएसएमटीदरम्यानच्या प्रवासाकरिता दीड तासापेक्षा जास्त कालावधी लागला. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकल प्रचंड विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. मेल, एक्स्प्रेस कूर्मगतीने धावत असल्याने लोकलचे वेळापत्रक आणखी बिघडले.
...
रस्ते वाहतूकही मंदावली
पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तेथील वाहतूक गोखले ब्रिजमार्गे वळविण्यात आली. वाहतूक संथ गतीने सुरू होती. पाणी साचल्याने रामनगर सबवे येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती. जयकर रोड ते ठाकूरद्वार रोड (काळबादेवी) दरम्यान रस्ता खचल्यामुळे वाहतूक बंद केली असल्याने एम. के. रोड (गिरगाव) मार्गे वळविण्यात आली. वाकोला पूल उतरण येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT