मुंबई

नाल्‍यात सापडलेल्‍या अजगराच्या अंड्यांतून २२ पिलांना जन्म

CD

नाल्‍यात सापडलेल्‍या अजगराच्या अंड्यांतून २२ पिलांना जन्म
वन विभाग, रॉ संस्‍थेचे प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पूर्व द्रुतगती मार्गावरील नाल्यातून दोन महिन्यांपूर्वी एका भारतील वंशातील अजगराचे ‘रॉ’ या प्राणीमित्र संस्‍थेने बचाव करून जीवदान दिले होते. त्याच अजगराच्या अंड्यांमधून आतापर्यंत २२ पिल्लांचा जन्म झाला आहे.
महाराष्ट्र वन विभाग आणि ‘रॉ’ संस्‍थेच्या संयुक्त प्रयत्नातून मे महिन्यात पूर्व मॉन्सून देखभालीदरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर नऊ फूट लांबीच्या मादी अजगरासह तिची २२ अंडी सापडली होती. या वेळी अजगराची योग्य देखभाल करून जीवदान देण्यात आले होते.
पुनर्वसन तज्‍ज्ञांच्या पथकाने नियंत्रित वातावरणात तिची २२ अंडी अथक प्रयत्न करून उबवली. पथकातील रितिक जयस्वाल आणि भूषण साळवे यांनी यासाठी अथक प्रयत्न केले. डॉ. प्रीती साठे यांनी बचावानंतर मादी अजगराची तपासणी केली. तिला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आणि वन विभागासोबत जंगलात परत सोडण्यात आले.
कृत्रिम पद्धतीने अंडी उबवण्यासाठी ‘रॉ’ संस्थेकडे सोपवण्यात आली. या अंड्यांच्या देखभालीचे काम प्राणीशास्त्रज्ञ चिन्मय जोशी यांनी पाहिले. दोन महिन्यांनंतर सोमवारी पहाटे अंड्यातून पिल्ले बाहेर पडू लागली. पिल्ले सामान्य आणि सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून नंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडले जाईल, अशी माहिती संस्थेचे प्रमुख पवन शर्मा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT