मुंबई

मुंबईत उंदीर मारण्याच्या मोहिमेवर पालकमंत्र्यांची शंका : चौकशी करण्याचे करण्याचे निर्देश

CD

उंदीर मारण्याच्या मोहिमेवर शंका
चौकशी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबईत मागील सहा महिन्यांत अडीच लाख उंदरांचा खात्मा केल्याचा दावा महापालिकेने केला आहे; मात्र ही आकडेवारी संशयास्पद असून, तीन महिन्यांत राबविलेल्या मोहिमेची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी बुधवारी (ता. २५) महापालिकेला दिले. दरम्यान, यापूर्वी मंत्रालयात उंदीर मारण्याच्या दाव्यावर विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनीही संशय व्यक्त केला होता.
महापालिकेने मागील सहा महिन्यांत अडीच लाख उंदरांचा खात्मा केला. १ ते २१ जून या कालावधीत विषारी गोळ्या वापरून मारलेल्या उंदरांची संख्या १,७४१, तर पिंजरे लावून २,०१५ उंदीर पकडण्यात आले. मुंबईतील १७ वॉर्डात उंदीर मारण्याचे काम १७ संस्था करतात, तर पिंजरा लावून उंदीर पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात. ही सर्व आकडेवारी शंकास्पद असून, याबाबत तीन महिन्यांची चौकशी करण्यात यावी. अनेक वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि विधानसभेचा तीन वेळा आमदार म्हणून मुंबईत काम करताना, अशाप्रकारे उंदीर मारल्याचे कधी निदर्शनास आले नाही. पिंजरा कुठे लावला, हेही कधी पाहण्यात आले नाही, असे सांगत अहवाल सादर करण्याचे निर्देश शेलार यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.
......
पालकमंत्र्यांचे सवाल
- पालिकेने नेमके किती उंदीर मारले?
- मृत उंदरांची विल्हेवाट कुठे लावली?
- किती विभागांत ही मोहीम राबवली?
- मोहिमेचे छायाचित्रीकरण केले का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran cyber attack: इराणचा डिजिटल हल्ला? समुद्राखालील केबल्स धोक्यात, भारतातील इंटरनेट-बँकिंग विस्कळीत होण्याची भीती

Sambhajinagar News: कन्नडमध्ये ‘हायटेक’ स्वच्छतेची सुरुवात; ८ हजार मालमत्तांचे जिओ टॅगिंग

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीमुळे नुकसान, शेतमाल मातीमोल, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Beed News: बीडमध्ये गर्भवती महिलेला मारहाण; ‘तिहेरी तलाक’ देत हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT