३०व्या माळ्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
आत्महत्या, अपघात की घातपात? पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई, ता. २५ : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मंगळवारी (ता. २४) सायंकाळी भांडुप येथील महिंद्रा स्प्लेंडर इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत ही आत्महत्या होती, अपघात की घातपात याबाबत तपास सुरू केला आहे. अस्मी अक्षय चव्हाण (वय १५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती आत्महत्या करणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना देत मामा संदीप शिंदे यांनी घातपाताकडे इशारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मी तिच्या आईसोबत मुलुंड येथे वास्तव्यास होती. महिंद्रा स्प्लेंडर इमारतीतील ए विंगमध्ये राहणारा मित्र आदित्य अरुण (वय १९) याला भेटण्यासाठी अस्मी आली होती. पूर्वी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. पुढे दोघे वेगवेगळ्या संस्थांमध्ये शिकू लागले. अस्मी आणि आदित्य इमारतीच्या डी विंगच्या ३२व्या माळ्यावर लिफ्टने गेले. त्यानंतर ते ३० आणि ३१ मजल्यांमधील खिडकीजवळ आले. तेथे दोघांमध्ये संवाद झाला. त्यानुसार अस्मीने अभ्यासाचा तणाव आणि नैराश्य आल्याचे सांगितले. आदित्य तिची समजूत काढून तेथून निघून गेला. त्यानंतर काहीच वेळात अस्मी या खिडकीतून खाली पडली. जखमी अस्मीला प्रथम मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.