मुंबई

अल्पवयीन मुलीला अर्धनग्न केल्याप्रकरणी आठ महिलांवर गुन्हा

CD

अल्पवयीन मुलीला अर्धनग्न केल्याप्रकरणी आठ महिलांवर गुन्हा

मुंबई, ता. २५ : वापरलेले सॅनिटरी पॅड इमारतीच्या आवारात टाकल्याच्या संशयावरून आठ महिला एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरल्या, मुलीसह तिच्या आईस शिवीगाळ केली. कहर म्हणजे या मुलीला अर्धनग्न करून तिची अंतर्वस्त्रे तपासल्याची घटना समोर आली आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या या तक्रारीवरून उत्तर मुंबईतील पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून, ही घटना मार्चमध्ये शासकीय वसाहतीत घडली. तेव्हा मुलीची आई तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात आली होती; मात्र समझोता झाल्याने महिलेने ही तक्रार मागे घेतली होती, मात्र या महिलेने मंगळवारी (ता. २४) पुन्हा याप्रकरणी तक्रार दिल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. शासकीय आस्थापनेतील कामगारांच्या वसाहतीतील एकाच इमारतीत आरोपी महिला आणि पीडित मुलगी राहते. पीडित मुलीचे वडील आणि आरोपी महिलांचे पती एकाच आस्थापनेतील भिन्न विभागात कार्यरत आहेत. या वसाहतीत पीडित कुटुंबाला शासकीय निवासस्थान देण्यात आल्याने अन्य कुटुंबांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावरून वाद सुरू झाले होते. त्याच वादातून आरोपी महिलांनी ही कृत्य केल्याचा संशय आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT